आता अॅपवरुन भरा आयटीआर!

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

मुंबई: प्राप्तिकर विवरणपत्राच्या(आयटीआर) ई-फायलिंगची किचकट पण आवश्यक अशी प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांमध्ये पार पडणे शक्य झाले आहे. सरकारमान्य वेबसाईट 'ऑल इंडिया आयटीआर'ने प्राप्तिकर भरण्यासाठी एक मोबाईल अॅप्लिकेशन सादर केले आहे. ज्यावरुन करदात्यांना स्वतःहून प्राप्तिकर विवरणपत्र भरता येणार आहे.

"सध्या विवरणपत्र भरण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेत हे मोबाईल अॅप्लिकेशन सादर करण्यात आले आहे. यामुळे करदात्यांना तज्ज्ञांच्या मदतीशिवाय स्वतःच प्राप्तिकर तयार करण्यास मदत होईल.", असे ऑल इंडिया आयटीआरचे संस्थापक विकास दहिया म्हणाले.

या अॅप्लिकेशनवरुन करदात्यांना आपले रिफंड स्टेटस, प्राप्तिकराचा आकडा तसेच एचआरएमधील सूट याविषयी माहिती मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे, या सर्व प्रक्रियेविषयी असणाऱ्या शंकांचे निरसनदेखील केले जाणार आहे. अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम्सवर हे अॅप्लिकेशन आहे.

Web Title: Now fill ITR on app!