‘त्याला’ आता जेट एअरवेजने करता येणार आयुष्यभर मोफत प्रवास!

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

नवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात केरळच्या एका गरोदर महिलेने एका अपत्यास जन्म दिल्याची घटना घडली. या महिलेचे नाव काय हे समजू शकलेले नाही. मात्र जेट एअरवेजच्या विमानात जन्म घेतलेल्या या मुलाला आता जेट एअरवेजकडून आयुष्यभर मोफत हवाई प्रवास करता येणार आहे.

9 डब्ल्यू 569 या विमानाने आज पहाटे 2.55 वाजता येथून उड्डाण केले होते. या विमानातून एक गरोदर महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर याची कल्पना तिने विमानातील कर्मचाऱ्यांना दिली. हे विमान अरबी समुद्रावरून प्रवास करत असतानाच तिने एका बाळास जन्म दिला. या विमानातून एक परिचारिकाही प्रवास करत होती. तिने यासाठी मदत केली. नंतर या विमानाची दिशा बदलून ते मुंबईकडे आणण्यात आले. तेथे उतरताच सदर महिला व तिच्या नवजात बाळास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जेट एअरवेजच्या नियमानुसार, गरोदर महिलेकडे प्रवास करण्याबाबत डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र असेल तर 36 आठवड्यापर्यंतची गरोदर महिला प्रवास करू शकते. त्यामुळे या केरळच्या महिलेला प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र बाळाने हवेतच जन्म घेतल्याने त्याचे राष्ट्रीयत्व कोणते, याची माहिती मिळालेली नाही. मात्र जेट एअरवेजच्या विमानात हवेतच जन्म घेतल्याने
त्या मुलाला आयुष्यभर मोफत प्रवास करता येणार आहे.

Web Title: Now Jet Airways can travel for a lifetime!