आता बँकेत जायची गरजच राहणार नाही…

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

नवी दिल्ली: येत्या काळात ऑनलाईन बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे प्रत्यक्ष बँकांचे अस्तित्व संपुष्टात येईल, असे भाकीत नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले आहे.

"येत्या पाच सहा वर्षांमध्ये प्रत्यक्ष बँका पुर्णपणे नाहीशा होतील असे मला वाटते. लोकांच्या माहितीचे परीक्षण करुन कर्ज देणाऱ्या फिनटेक स्टार्टअप्सच्या तुलनेत एखादी बँक चालविण्यासाठी येणारा खर्च प्रचंड असतो. ", असे कांत म्हणाले. ते आयएएमएआयच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

गेल्या 45 वर्षांमध्ये केवळ 28 नव्या बँका तयार झाल्या, मात्र 18 महिन्यांमध्ये 21 कंपन्यांना पेमेंट बँकेच्या स्थापनेचा परवाना मिळाला, असेही कांत यांनी यावेळी नमूद केले. मोबाईल स्मार्टफोन आणि इंटरनेटवरुन व्यवहारांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे, आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना एखाद्या व्यक्तीच्या माहितीचे परीक्षण करुन त्याला कर्जे देऊ शकतात.

Web Title: Now you will not need to go to the bank ...