टाटा केमिकल्समधूनही वाडिया बाहेर 

पीटीआय
रविवार, 25 डिसेंबर 2016

मुंबई : टाटा केमिकल्सच्या विशेष सर्वसाधारण सभेत स्वतंत्र संचालक नुस्ली वाडिया यांची हकालपट्टी करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. वाडिया हे टाटा केमिकल्सचे गेली 35 वर्षे स्वतंत्र संचालक होते. 

मुंबई : टाटा केमिकल्सच्या विशेष सर्वसाधारण सभेत स्वतंत्र संचालक नुस्ली वाडिया यांची हकालपट्टी करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. वाडिया हे टाटा केमिकल्सचे गेली 35 वर्षे स्वतंत्र संचालक होते. 

काल (शुक्रवारी) झालेल्या सभेत टाटा सन्सने वाडिया यांना हटविण्याबाबत ठराव मांडला. या ठरावाच्या बाजूने 75.67 टक्के भागधारकांनी मतदान केले. टाटा केमिकल्सच्या 25.48 कोटी समभागांपैकी 14.19 कोटी समभागांचे मतदान झाले. यातील 11.28 कोटी समभागांचे मतदान वाडियांच्या विरोधात झाले. वाडियांच्या बाजूने 3.62 कोटी मते म्हणजेच एकूण 24.33 टक्के मतदान झाले. याआधी वाडिया यांनी टाटा सन्स, सन्सचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा आणि संचालक मंडळाविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. 

टाटा केमिकल्सने मागील महिन्यात विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस भागधारकांना पाठविली होती. टाटा सन्सकडून सायरस मिस्त्री आणि नुस्ली वाडिया यांना हटविण्याचा ठराव मांडण्यासाठी ही सभा बोलाविण्यात आली होती. मात्र, याआधीच मिस्त्री यांनी टाटा समूहातील कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. 

संचालकपदी भट, पद्मनाभन 
सभेत कंपनीच्या संचालकपनी भास्कर भट यांची निवड करण्याच्या ठरावाच्या बाजूने 79.26 टक्के मते मिळाली. तसेच, पद्मनाभन यांचीही संचालकपदी निवड करण्यास भागधारकांनी मंजुरी दिली.

Web Title: Nusli Wadia removed from Tata Chemicals