कौतुकास्पद! 10 सेल्फ-मेड अब्जाधीशांच्या यादीत फाल्गुनी नायरचा समावेश

फाल्गुनी नायर यांनी जगातील 10 सेल्फ-मेड अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान
Nykaa founder Falguni Nair
Nykaa founder Falguni Nairesakal
Summary

फाल्गुनी नायर यांनी जगातील 10 सेल्फ-मेड अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान

नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर (Nykaa founder Falguni Nair) यांना जगातील 10 सेल्फ-मेड अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. या यादीत त्यांचे नाव नवीन आहे. त्यांची संपत्ती 7.6 अब्ज डॉलर्स आहे. हुरुन संशोधन संस्थेने (Hurun Research Institute) ही यादी जाहीर केली आहे.

Nykaa founder Falguni Nair
अब्जाधीश रतन टाटांनी छोटासा केक कापून साधेपणाने साजरा केला 'वाढदिवस'

टॉप 10 मध्ये स्थान मिळवणाऱ्या नायर एकमेव भारतीय

फाल्गुनी नायर या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. टॉप 10 मध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या एकमेव भारतीय आहे. याआधी, बायकॉनच्या प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांना मागे टाकत भारतातल्या सर्वात श्रीमंत सेल्फ-मेड महिला बनल्या.

नायका गेल्या वर्षी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट

नायकाच्या (Nykaa) एक युनिकॉर्न आहे जो वेबसाइट्स आणि अॅप्सद्वारे महिलांच्या सौंदर्य उत्पादनांची विक्री करतो. त्यात अनेक ब्रिक एंड मोर्टार स्टोअर्सही आहेत. गेल्या वर्षी, नायका स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाले.

Nykaa founder Falguni Nair
Nykaa IPO : फाल्गुनी नायर मालामाल! एका दिवसात 'एवढ्या' कोटींनी वाढली संपत्ती

जगात फक्त 124 सेल्फ मेड अब्जाधीश

या यादीत 124 सेल्फ मेड महिलांचा समावेश असल्याचे हुरुनने म्हटले आहे. या सर्व महिला 16 देशांतील आहेत. गंमत म्हणजे जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा आणि दक्षिण कोरिया असे देश आहेत , ज्यांच्या देशातील एकही महिला या यादीत स्थान मिळवू शकलेली नाही. पण त्याचवेळ गेल्या दशकात भारतात सेल्फ मेड महिलांची संख्या तिपटीने वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. आज जगात 124 सेल्फ मेड महिला आहेत. ही संख्या पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे हुरुनचे अध्यक्ष आणि मुख्य संशोधक रुपर्ट हुगेवुर्फ यांनी म्हटले.

Nykaa founder Falguni Nair
'करो वा मरो' लढतीत भारतीय महिला संघाची दमदार सुरुवात

बीजिंगची वू याजुन जगातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला

बीजिंगस्थित प्रॉपर्टी डेव्हलपर वू याजुन ही जगातील सर्वात श्रीमंत सेल्फ-मेड महिला आहे. 58 वर्षीय यजुन यांची संपत्ती 17 अब्ज डॉलर आहे. जगातील सेल्फ-मेड महिलांपैकी दोन तृतीयांश महिला चीनमध्ये आहेत. या यादीत पहिल्या 10 पैकी 7 स्थानांवर चिनी महिला आहेत हे विशेष.

या यादीत भारताच्या राधा वेंबूंचाही समावेश

या यादीत फाल्गुनी नायर आणि किरण मुझुमदार शॉ यांच्याशिवाय राधा वेंबूचाही समावेश आहे. त्या झोहोच्या सह-संस्थापक आहे. त्या भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत सेल्फ-मेड महिला आहे. त्यांची संपत्ती 3.9 अब्ज डॉलर्स आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com