पेट्रोलचे दर कमी होणार? 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

नवी दिल्ली:पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.वाढत्या किमतींना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोलमागे 1 रुपयाचा भार उचलण्याची सूचना केली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारात आज (बुधवार) सार्वजनिक क्षेत्रातील  तेल कंपन्यांचे शेअर्स आज दुपारच्या सत्रात गडगडले. ग्राहकांना जास्तीत जास्त संभाव्य लाभ मिळवून देण्यास तेल कंपन्यांनी प्रयत्न करावे असे सरकारकडून सांगण्यात आले. 

मुंबई शेअर बाजारात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 8 टक्क्यांची घसरण झाली आहे.  तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. शेअरमध्ये 7.42 टक्क्यांची म्हणजेच 27.05 रुपयांची घसरण झाली असून 337.70 रुपयांवर व्यवहार करतो आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा शेअर 6.30 टक्क्यांच्या घसरणीसहा 168 रुपयांवर व्यवहार करतो आहे. तर  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये 6.89 टक्क्यांची म्हणजेच 31.05 रुपयांची घसरण झाली आहे. तो शेअर  419.90 रुपयांवर व्यवहार करतो आहे. तसेच  चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा शेअर 331.10 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 19.25 रुपयांची घसरण झाली आहे. 

Web Title: Oil companies shares tank 8 pct on reports government to ask to absorb Re 1 litre hike