पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप

वृत्तसंस्था
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली:  सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या लवकरच देशभरात 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप करणार आहेत. यामुळे देशातील पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट होणार आहे. यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांचा समावेश आहे. या चार कंपन्यांनी देशभरात 55,649 पेट्रोल पंप उभारण्यासंदर्भात जाहिराती दिल्या आहेत. 'याचा निवडणूकांशी काहीही संबंध नसून निवडणूका असलेल्या राज्यांचा यात समावेश नाही', असे मत एचपीसीएलचे राज्यस्तरित समन्वयक विशाल वाजपेयी यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली:  सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या लवकरच देशभरात 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप करणार आहेत. यामुळे देशातील पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट होणार आहे. यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांचा समावेश आहे. या चार कंपन्यांनी देशभरात 55,649 पेट्रोल पंप उभारण्यासंदर्भात जाहिराती दिल्या आहेत. 'याचा निवडणूकांशी काहीही संबंध नसून निवडणूका असलेल्या राज्यांचा यात समावेश नाही', असे मत एचपीसीएलचे राज्यस्तरित समन्वयक विशाल वाजपेयी यांनी व्यक्त केले आहे. यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन नवीन 26,982 पेट्रोल पंप उभे करणार आहे. 

कंपनीचे याआधीच 27,377 पेट्रोल पंप अस्तित्वात आहेत. बीपीसीएल नवीन 15,802 पेट्रोल पंप उभे करणार आहे. कंपनीचे याआधीच 14,592 पेट्रोल पंप अस्तित्वात आहेत. एचपीसीएल नवीन 12,865 पेट्रोल पंप उभे करणार आहे. कंपनीचे याआधीच15,287 पेट्रोल पंप अस्तित्वात आहेत. या पेट्रोल पंपांचे लायसन्स मिळवण्यासाठीची शैक्षणिक पात्रता आता शिथिल करत 12 वी पास वरून 10 वी पासवर आणण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oil PSUs to allot 65,000 petrol pumps