ओकिनावाची ई-स्कूटर  ‘लाईट’ लाँच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ओकिनावा स्कूटर्स ही फेम-टू मंजुरी मिळवणारी भारतातील पहिली इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी असून, कंपनीचा भर ‘मेड इन इंडिया’वर आहे.

नवी दिल्ली : ओकिनावा स्कूटर्स ही फेम-टू मंजुरी मिळवणारी भारतातील पहिली इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी असून, कंपनीचा भर ‘मेड इन इंडिया’वर आहे. ओकिनावाने आज आपल्या नवीन ई-स्कूटर ‘लाईट’च्या लाँचिंगची घोषणा केली. या स्कूटरची एक्‍स-शोरूम किंमत ५९,९९० रुपये आहे. नवीन ‘लाईट’मध्ये ‘वन फॉर ऑल’ या ब्रॅण्डच्या तत्त्वाचे प्रतिबिंब दिसून येते. तरुण वर्ग व स्त्रिया या देशातील परिवर्तनाच्या चालकांना डोळ्यांपुढे ठेवून ही स्कूटर तयार करण्यात आली आहे.

नवीन लाईट स्पार्कल व्हाईट आणि स्पार्कल ब्ल्यू या दोन अप्रतिम रंगांमध्ये उपलब्ध आहे. डिटॅचेबल लिथिअम आयन बॅटरीयुक्त अशी ही स्कूटर वापरण्यास सोपी व कमी खर्चिक आहे. नवीन लाइटच्या ग्राहकांसाठी ब्रॅण्ड ३ वर्षांची मोटर आणि बॅटरी वॉरंटी अनेकविध सुविधांसह देऊ करत आहे. ‘लाईट’च्या अनोख्या सुविधांपैकी एक म्हणजे अँटि-थेफ्ट बॅटरी लॉक. यामध्ये लि-आयन बॅटरी आतमधून लॉक होऊन जाते व चोरी किंवा नुकसानीपासून स्कूटरचे संरक्षण होते. स्कूटर चोरीला जाणे किंवा तिचे नुकसान केले जाणे ही ग्राहकांपुढील मोठी चिंता त्यामुळे दूर होणार आहे.  

ई-स्कूटरमध्ये हझार्ड फंक्‍शन, इनबिल्ट पिलियन रायडर फूटरायडर आणि एलईडी स्पीडोमीटर या सुविधा आहेत. स्कूटर एलईडी हेडलाईट, एलईडी विंकर्स आणि शैलीदार एलईडी टेल लाइट्‌स, स्वयंचलित इलेक्‍ट्रॉनिक हॅण्डल, सेल्फ-स्टार्ट पुश बटन आणि आयताकृती टाइप फ्रण्ट सस्पेन्शन दमदार स्टील फ्रेमच्या बॉडीसह देण्यात आले आहे.

web title : Okinawachi e-scooter Light launched


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Okinawachi e-scooter Light launched