पेट्रोल पंपावर पाचशेच्या नोटा उद्यापर्यंतच घेणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पेट्रोल पंपांवर जुन्या नोटांसाठी कमिशन घेतले जात असल्याचे दिसून आल्याने केंद्र सरकारने तातडीने निर्णय मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई - पेट्रोल पंप आणि विमान तिकीटासाठी उद्या (शुक्रवार) मध्यरात्री म्हणजे 2 डिसेंबपर्यंतच पाचशे रुपयांची जुनी नोट स्वीकारणार येणार आहेत. यापूर्वी सरकारने काढलेल्या आदेशात या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार असे म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंदीचा निर्णय 8 नोव्हेबरला घेतल्यानंतर देशभरात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पेट्रोल पंप व सरकारी कार्यालयांमध्ये चालणार असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पेट्रोल पंपांवर हजार रुपयांची नोट स्वीकारणे बंद करून पाचशे रुपयांची नोट 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार असे स्पष्ट करण्यात आले होते. आता शुक्रवारपर्यंतच या ठिकाणी जुन्या नोटा स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर या नोटा वापरणे शक्य होणार नाही. 

पेट्रोल पंपांवर जुन्या नोटांसाठी कमिशन घेतले जात असल्याचे दिसून आल्याने केंद्र सरकारने तातडीने निर्णय मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हवाई तिकीटांसाठीही ही नोट वापरता येणार नाही. उद्यापासून टोल नाक्यांवरही वसूली सुरु करण्यात येणार आहे.

Web Title: Old Rs 500 notes valid till Dec 2 for fuel, air ticket purchase