एका लाखाचे दीड कोटी झाल्याचे कधी ऐकलंय का ? 'या' शेअरची कमाल

न भुतो न भविष्यती असा परतावा
एका लाखाचे दीड कोटी झाल्याचे कधी ऐकलंय का ?  'या' शेअरची कमाल

- शिल्पा गुजर

Multibagger Stocks: एचडीएफसी बँकेच्या शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना गर्भश्रीमंत केले आहे. कारण एचडीएफसीचे शेअर्स सध्या उच्चांकावर पोहोचले आहेत. तब्बल 1725 रुपयांची पातळी गाठली आहे. या शेअर्सने 1650 रुपयांचा ब्रेकआउट ओलांडला आहे आणि आता हे शेअर्स l 1800 रुपयांची पातळी गाठू शकतात. दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना याचा प्रचंड फायदा झाला.

एका लाखाचे दीड कोटी झाल्याचे कधी ऐकलंय का ?  'या' शेअरची कमाल
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका; जाणून घ्या आजचे दर

एचडीएफसी बँकेच्या किंमतीच्या इतिहास पाहिल्यास, त्याने गेल्या एका महिन्यात 8% परतावा दिला आहे. यात, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1559 रुपयांवरून 1680 रुपये झाले आहेत. त्याचबरोबर गेल्या एका वर्षात त्याचे शेअर्स 1200 रुपयांवरून 1680 रुपये झाले आहेत. या कालावधीत शेअर होल्डर्सना 40 टक्के परतावा मिळाला.

त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षात, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 635 रुपयांवरून 1680 रुपये झाले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांना 165 टक्के परतावा मिळाला. जर तुम्ही गेल्या 22 वर्षांचे परतावे पाहिले तर ज्यांच्याकडे हे शेअर्स आहेत ते अती श्रीमंत झाले आहेत. एचडीएफसी बँकेचा शेअर 15 ऑक्टोबर 1999 रोजी 9.82 रुपयांवर बंद झाला आणि आता त्याच्या शेअरची किंमत 1680 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत, एचडीएफसी बँकेच्या समभागांनी 1.7 पट म्हणजे 16950 टक्के इतका रग्गड परतावा दिला आहे.

एका लाखाचे दीड कोटी झाल्याचे कधी ऐकलंय का ?  'या' शेअरची कमाल
सोन्याच्या भावात घट, चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

यानुसार, जर तुम्ही 1999 मध्ये HDFC बँकेच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 1.70 कोटी इतकी जबरदस्त असती. दुसरीकडे, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 2.65 लाख रुपये झाली असती.

एचडीएफसी बँकेचे शेअर्स आणखी वाढू शकतात असे मत शेअर बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बँकेने सप्टेंबर तिमाहीत मजबूत परिणाम दिले आहेत आणि यात आणखी तेजी येईल असेही तज्ज्ञ सांगत आहेत.

एका लाखाचे दीड कोटी झाल्याचे कधी ऐकलंय का ?  'या' शेअरची कमाल
Share मार्केट मंगळवारी डाऊन! बाजारात आज कोणते शेअर्स मिळवून देतील फायदा?

एचडीएफसी बँकेने अलीकडेच 1650 रुपयांचा ब्रेकआउट ओलांडला आहे आणि आता 1750-1800 रुपयांच्या टार्गेटसह हा शेअर खरेदी करता येईल असे चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक समीत बगाडिया म्हणाले. सोबतच 1630 रुपयांवर स्टॉप लॉस लावायला विसरू नका असेही बगाडीया यांनी सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com