एकीकडे ‘आयटी’ची नोकरकपात; दुसरीकडे अधिग्रहण

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असलेल्या विप्रो आणि कॉग्निझंटने बीपीओ सेवा पुरवठादार आणि आयटी कन्सल्टन्सी फर्मची खरेदी केली आहे. कॉग्निझंटने हेल्थ केअर सर्व्हिस कॉर्पोरेशनची (एचसीएससी) सहाय्यक कंपनी असलेल्या 'टीएमजी हेल्थ'ची खरेदी केली आहे. कॉग्निझंटने मात्र खरेदीच्या व्यवहाराचा तपशील जाहीर केलेला नाही.

2017 च्या तिसऱ्या तिमाहीत हा व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे कॉग्निझंटकडून सांगण्यात आले. 'टीएमजी हेल्थ' ही 2008 पासून एचसीएससीची उपकंपनी असून अमेरिकेतील पेनसिल्वेनिया आणि टेक्सासमध्ये कार्यालये आहेत. अमेरिकेतील विविध वैद्यकीय प्रकल्पांना बीपीओ सेवा पुरवण्याचे कार्य करते.

भारतातील तिसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या 'विप्रो'ने देखील आयटी कन्सल्टिंग फर्म असलेल्या 'ड्राइवस्ट्रीम'मध्ये आठ लाख अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. आता विप्रोची 'ड्राइवस्ट्रीम'मधील हिस्सेदारी 26.1 टक्क्यांवर पोचली आहे. 2001 मध्ये स्थापन झालेल्या 'ड्राइवस्ट्रीम'मध्ये 73 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने 2016 मध्ये 2 कोटी अमेरिकी डॉलर्सचे उत्पन्न मिळविले होते.

विप्रोने  एकास-एक (1:1) बोनस शेअर दिला आहे.

Web Title: On one hand, 'IT' promotion; Acquisition on the other hand