एक तृतीयांश कंपन्यांना डेटा चोरीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

डेटा चोरीमुळे देशातील जवळपास एक तृतीयांश कंपन्यांना फटका बसला आहे. डेटा चोरीसारख्या घटनांमुळे कंपन्यांचे छबी मलीन झाली असून अंतर्गत आणि बाह्य घटकांमुळे नुकसान सहन करणाऱ्या कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे.

नवी दिल्ली - डेटा चोरीमुळे देशातील जवळपास एक तृतीयांश कंपन्यांना फटका बसला आहे. डेटा चोरीसारख्या घटनांमुळे कंपन्यांचे छबी मलीन झाली असून अंतर्गत आणि बाह्य घटकांमुळे नुकसान सहन करणाऱ्या कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे. 

"क्रोल्स" या संस्थेच्या अहवालानुसार 33 टक्के भारतीय कंपन्यांची बाजारातील प्रतिमा मलीन झाली आहे. गेल्या वर्षभरात 41 टक्‍के कंपन्या डेटा चोरीच्या शिकार बनल्या आहेत. जागतिक स्तरावर ही सरासरी 29 टक्के आहे. डेटा चोरी, त्रयस्थांकडून मलीन होणारी प्रतिमा आणि त्याचे व्यासायिक संबधांवर होणारे परिणाम तसेच सोशल मीडियाचे विपरित परिणाम ही मुख्य कारणे असल्याचे "क्रोल्स" ने अहवालात म्हटले आहे. भारतीय कंपन्यांकडून जोखीम कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहे. डेटा सुरक्षेबाबत कंपन्या सतर्क बनत असल्याचे "क्रोल्स"चे व्यवस्थापकीय संचालक तरूण भाटीया यांनी सांगितले.

नवी नेमणूक, व्यावसायिक भागिदार यांच्याशी माहितीची देवाण घेवाण करताना कंपन्यांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे भाटिया यांनी सांगितले. सुशासन आणि योग्य ती प्रणाली कंपन्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यास फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One-third of companies face data theft