‘ओएनजीसी’ला मिळणार मोठा लाभांश; शेअर तेजीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई: ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला (ओएनजीसी) परदेशी भागीदार कंपनी असलेल्या व्हेनेझुएलाच्या सरकारी कंपनीकडून मोठा लाभांश मिळणार आहे. परिणामी या सकारात्मक बातमीमुळे आज (मंगळवार) इंट्राडे व्यवहारात ओएनजीसीचा शेअर सकाळच्या सत्रात 5 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने 212 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे.

परदेशी भागीदार कंपनी असलेल्या व्हेनेझुएलाच्या 'पीडीवीएसए'कडून ओएनजीसीला सुमारे रु.3700-4000 कोटींचा लाभांश मिळणार आहे. ओएनजीसी विदेश लिमिटेडने गेल्यावर्षी व्हेनेझुएलाच्या 'पीडीवीएसए'सोबत करार केला होता. त्यानुसार 54 कोटी डॉलरच्या थकबाकीपोटी ओएनजीसीला प्रतिदिन 17,000 बॅरल्स तेल मिळणार होते.

ओएनजीसीची व्हेनेझुएलाच्या सरकारी कंपनीमध्ये 40 टक्के हिस्सेदारी आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात ओएनजीसीचा शेअर 203.90 रुपयांवर व्यवहार करत असून तो 2.25 रुपयांनी म्हणजेच 1.12 टक्क्यांनी वधारला आहे. पाच रुपये दर्शनी किंमत असलेल्या शेअरने वर्षभरात 125.40 रुपयांची नीचांकी तर 212 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.261,798 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: ongc shares now high