स्नॅपचॅटवर बहिष्कार; स्नॅपडीलला फटका

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

नवी दिल्ली : स्नॅपचॅटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भारतासारख्या गरीब देशात विस्तार करण्यास इच्छुक नसल्याच्या कथित विधानाचा सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. स्नॅपचॅटच्या ऍपवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आणि नामसाधर्म्यामुळे स्नॅपडीलवर बहिष्कार टाकण्यात त्याची परिणती झाली.

स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान स्पिगल यांनी भारतासारख्या गरीब देशात विस्तार करण्यास इच्छुक नसल्याचे विधान केल्याचा आरोप कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने केला. याचे पडसाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटले. लगेचच ट्‌विटरवर "बॉयकॉट स्नॅपचॅट' असा ट्रेंड सुरू झाला. या ट्रेंडमुळे स्नॅपचॅटचे ऍप मोठ्या प्रमाणात यूजर्स "अनइन्स्टॉल' करू लागले आणि ऍपला कमी रेटिंग देऊ लागले. मात्र, अतिउत्साही यूजर्सनी स्नॅपचॅटच्या जागी स्नॅपडीलचे ऍप "अनइन्स्टॉल' करण्यास सुरवात केली. अखेर ट्‌विटरवर काही यूजर्सनी हा प्रकार उजेडात आणला. दरम्यान, माजी कर्मचाऱ्याने केलेले आरोप स्नॅपचॅट कंपनीने फेटाळले आहेत.

(अर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा : sakalmoney.com )

Web Title: Oops. People Are Boycotting Snapdeal Instead Of Snapchat