यंदाच्या प्रजासत्ताक दिनी गुंतवणूक करा बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिटमध्ये

टीम ई-सकाळ
Saturday, 25 January 2020

बाजारपेठेत आघाडीचे व्याजदर देण्यासाठी बजाज फायनान्स ओळखली जाते. ग्राहकाच्या प्रोफाइलनुसार हे दर बदलतात.

आपला देश यंदा 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. मग, या निमित्ताने आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल का करू नये? तुमच्या आर्थिक स्थितीचे संपूर्ण नियंत्रण तुमच्याच हातात असले की वापरता येण्यायोग्य रकमेचा कमाल वापर शक्य होतो. तुमच्या पैशाचे मूल्य वाढवण्याचा अत्यंत सोपा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट (Bajaj Finance Fixed Deposit) मधील गुंतवणूक. यात तुम्हाला अत्यंत आकर्षक व्याजदर मिळणार असल्याने तुमची गुंतवणूक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी खातरजमा या योजनेतून मिळते. इतकेच नाही, गुंतवणूकदार, बचत करणारे आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी हा अत्यंत चांगला पर्याय आहे.यंदाच्या प्रजासत्ताक दिनी तुम्ही बजाज फायनान्स एफडीमध्ये कशी गुंतवणूक करू शकाल, हे पाहूया.

8.35 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळवून संपत्ती वाढवा सुरक्षितपणे
बाजारपेठेत आघाडीचे व्याजदर देण्यासाठी बजाज फायनान्स ओळखली जाते. ग्राहकाच्या प्रोफाइलनुसार हे दर बदलतात. नवे ग्राहक, आधीपासूनचे ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे 8.10,8.20 आणि 8.35 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळवता येऊ शकतो. इतकेच नाही, तुम्हाला विविध धोक्यांपासूनही संरक्षण मिळते. या एफडीज बाजारपेठेशी जोडलेल्या नाहीत. शिवाय, या एफडीजना आयसीआरए एमएएए आणि क्रिसिल एफएएए असे दोन्ही रेटिंग्स असल्याने तुम्हाला सुरक्षितताही मिळते. संबंधित विभागात हे रेटिंग्स सर्वोच्च मानले जाते आणि त्यामुळे तुमची गुंतवणूक आणि ठरल्यानुसार परतावा असं सर्व काही कोणत्याही विलंबाविना मिळण्याची खात्री असते.

अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीच्या लक्ष्यांसाठी लवचिकता
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योग्य वेळी पैसे हातात येणं महत्त्वाचं आहे आणि बजाज फायनान्ससह आपले पैसे योग्य वेळेत मिळवण्यासाठी तुम्हाला कालावधीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे, विविध लक्ष्य गाठणे तुम्हाला शक्य होतो. तुम्ही 12 ते 60 महिने अशा कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता आणि  FD calculator चा वापर करून गुंतवणुकीतून कोणती लक्ष्ये गाठायची, हेसुद्धा ठरवू शकाल. या एफडीचा वापर करून तुम्ही संपत्ती कशी निर्माण करू शकाल, हे समजून घेण्यासाठी खालील तक्ता पहा

Image may contain: text

वारंवार कराव्या लागणाऱ्या खर्चांसाठी सतत पेआऊट मिळेल असा पर्याय निवडा
तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्यात या एफडीचा तुम्हाला बराच फायदा होईल. तुम्हाला 8.35 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याजदर मिळू शकतो. शिवाय, नियमित पेआऊटच्या माध्यामातून वारंवार उद्भवणारे खर्चही करता येतील. तुम्ही पाच वर्षांसाठी 20 लाखांची गुंतवणूक केली आहे असे समजून तुम्हाला वेळोवेळी काय फायदा होईल, हे या तक्त्यातून कळू शकेल.

Image may contain: possible text that says 'ग्राहकाचा पर्याय ज्येष्ठ नागरिक व्याजदर व्याजाचे पेआऊट पेआऊटची वारंवारता मासिक त्रेमासिक सहामाही वार्षिक 8.05% 13,417 8.10% रु. 40,500 8.18% रु. 81,800 8.35% रु. 1,67,000'

एसडीपीच्या साह्याने आर्थिक स्वातंत्र्याच्या वाटेवर जाऊया
तरुण कमावत्या वर्गालाही सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅन योजनेच्या माध्यमातून बचत करत आणि आपल्या बचतीवर उत्तम छयाज मिळवून लक्ष्यित पद्धतीने आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येईल. या पद्धतीने तुम्ही महागाईचा सामना करतानाच मासिक बचतीतून एक चांगली रक्कम जमा करू शकता आणि तेही महिन्याला फक्त 5000 रु. गुंतवून. दरमहा तुम्ही बाजूला काढलेली ही रक्कम एक नवी एफडी तयार करण्यासाठी वापरली जाईल. त्या-त्यावेळी ठेवींचा जो व्याजदर असेल तो तुमच्या या नव्या एफडीवर लागू होईल. एसडीपीसह तुम्ही पहिली ठेव चेकने करा आणि त्यानंतरच्या ठेवी एनएसीएच नियमांप्रमाणे. तुम्ही 12 ते 60 महिने या कालावधीसाठी 6 ते 48 डिपॉझिट्स याप्रकारे करू शकता. याच्या साह्याने तयार करण्यात आलेल्या या आकडेवारीवरून हे स्पष्ट होईल की एसडीपीमुळे तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवू शकाल.

Image may contain: one or more people

विविध मूल्यवर्धित गुंतवणूक पर्यायांचा लाभ घ्या
गुंतवणुकीच्या संपूर्ण कार्यकाळात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि लवचिक राहता यावे यासाठी बजाज फायनान्स तुम्हाला विविध पर्याय देऊ करत आहे. उदा. मल्टि-डीपॉझिट सुविधेच्या माध्यमातून एकाच चेकचा वापर  करून तुम्ही विविध कालावधीसाठी एकाहून अधिक एफडी करू शकता. त्याचबरोबर, गुंतवणूक करताना तुम्ही ऑटो-रीन्युअलचा पर्याय निवडल्यास तुम्हाला दीर्घकाळासाठी कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय गुंतवणूक कायम राखता येईल आणि नुतनीकरणाचा बोनसही मिळवता येईल. एफडीवर ऑनलाईन कर्ज घेण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे, तुम्ही चार लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता आणि तुमची एफडीही कायम राहील. काही ठिकाणी तर तुम्ही डेबिट कार्डाचा वापर करूनही एफडी करू शकता. गुंतवणूक करणं शक्य तितकं सोपं आणि कोणत्याही कटकटीविना व्हावं, यासाठीचा हा प्रयत्न आहे. चला तर मग, भारत यंदा प्रजासत्ताक साजरा करत असताना तुम्ही अधिक चांगल्या आर्थिक स्थितीसाठी योग्य निर्णय घ्या आणि विलंब न करता एक नवी सुरुवात करण्यासाठी  Bajaj Finance online FD  बुक करा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: open a fixed deposit account from republic day with bajaj finance