मंदीत कार खरेदीची संधी

Opportunity to buy a car in a recession
Opportunity to buy a car in a recession

कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या ही अतिशय उत्तम वेळ आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीत तुम्ही खरेदीची संधी साधू शकता. सध्या मारुती सुझुकी, ह्युंदाई, होंडासह इतर मोठ्या कंपन्यांनी कार खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत जाहीर केली आहे. कंपन्या आणि डिलर यांच्याकडून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलत देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कंपन्यांकडून काही प्रमुख कारवर मिळत असलेल्या सवलतीबाबत जाणून घेऊ...

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलै २०१८ पासून कार विक्रीत मोठी घट झाली आहे. जुलै २०१९ मध्ये ही घट वार्षिक ३१ टक्‍के इतकी कमी आहे, जी १९ वर्षांतील सर्वात मोठी घट ठरली आहे. विक्रेत्यांकडे सध्या मोठ्या प्रमाणात वाहने पडून आहेत. यामुळे कार विक्रीला बुस्ट देण्यासाठी कार उत्पादक अनेक मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणावर डिस्काऊंट देत आहेत. पुढील वर्षी बीएस ६ नियम लागू होणार असल्याने कार कंपन्या आणि विक्रेते आहे त्या कार विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. ३१ मार्च २०२० नंतर उत्पादक बीएस ४ इंजिन असलेल्या कारची विक्री करू शकत नाही. त्यामुळे जर बीएस ४ मॉडेलच्या कार शिल्लक राहिल्या तर त्या फेकून द्याव्या लागणार आहे.

मारुती आपल्या डिझायर कारवर ५० हजार रुपयांपर्यंतची सवलत (डिस्काउंट) देत आहे. एक्‍स्चेंज बोनस, फ्री इन्शुरन्स आणि ॲक्‍सेसरीजसारखे अन्य डिस्काऊंट मिळून ७० हजार रुपयांपर्यंतची सवलत डिझायर खरेदीवर मिळत आहे. डिझायरच्या पेट्रोल आवृत्तीची सुरुवातीची एक्‍स शोरुम किंमत ५.९ लाख रुपये आहे. मात्र, सवलत विचारात घेतल्यास अनेक डिलरशीपवर ५.३० लाख रुपयांच्या एक्‍स शोरुम किमतीवर तिला खरेदी करता येऊ शकते. डिझायर डिझेलवरील डिस्काऊंट पेट्रोल आवृत्तीच्या तुलनेत २० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.

मारुती सुझुकीची हॅचबॅंक स्विफ्टच्या डिझेल व्हेरिअंटवर सध्या जवळपास ६८ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट सुरू आहे. स्विफ्टची एक्‍स शोरुम किंमत सात लाख रुपये आहे. मात्र, सवलत पाहता ती ६.५ लाख रुपयांच्या सुरुवातीला एक्‍स शोरुम किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकते. मारुतीची अन्य मॉडेल, जसे की बलेनो आणि व्हिटारा ब्रेझावर ४० हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत सवलत आहे.

  ह्युंह्युंदाईची हॅचबॅक आय १० आणि कॉम्पॅक्‍ट सेदान एक्‍सेंटवर जवळपास ६० हजार रुपयांची सवलत मिळत आहे. यासह ३५ हजार रुपयांपर्यंतची अन्य सवलतही देण्यात आली आहे. डिस्काऊंटनंतर आय १०, ४.३५ लाख रुपये आणि एक्‍सेंट ५.१५ लाख रुपयांच्या एक्‍स शोरुम किमतीवर उपलब्ध आहे. ह्युंदाई आपल्या एक्‍झिक्‍युटिव्ह सेदान एलांट्रावरही १.२ लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहे.

जीप जीप इंडियाच्या तीन वेगवेगळ्या कार सध्या भारतात विक्रीला आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या कंपासवर सूट देण्यात आली आहे. २०१९ च्या मॉडेलवर ५० हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली असून, २०१८ च्या मॉडेलवर एक लाख ७५ हजार रुपये इतकी घसघशीत सवलत देण्यात आली आहे.

होंडा कार्स इंडियाचे विक्रेते सध्या कंपनीचे प्रसिद्ध मॉडेल अमेझ आणि सिटीवर ४० हजार रुपयांपर्यंतचा रोख डिस्काऊंट देत आहेत. अतिरिक्‍त वॉरंटी (हमी) आणि मोफत विमा (फ्री इन्शुरन्स) सह अन्य सवलतींचा विचार करता एकूण डिस्काऊंट ६० हजार रुपयांपेक्षा अधिक मिळत आहे.

फोर्डफोर्ड कंपनीने फोर्ड फिगो हॅचबॅकच्या खरेदीवर १५ हजार रुपयांची सूट दिली आहे. अस्पायर सेदानवर ३० हजार रुपयांची सवलत देण्यात आली असून, फोर्ड इकोस्पोर्ट कॉम्पॅक्‍ट एसयूव्हीवरही ४० हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे.

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कारच्या विक्रेत्यांकडूनही सध्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. केयूव्ही १०० मायक्रो एसयूव्हीवर सध्या जवळपास ६० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. तसेच एक्‍सयूव्ही ३०० सब कॉम्पॅक्‍ट एसयूव्हीवर १० हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. स्कॉर्पिओ आणि एक्‍सयूव्ही ५०० वरही अनुक्रमे ३५ हजार आणि ४५ हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे.

टोयोटाटोयोटाच्या कारवरही खरेदसाठी मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. यारीस सेदानवर यापूर्वीच १.२५ लाख रुपयांची सूट देण्यात येत होती. आता त्यामध्ये आणखी ५० हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. कोलोरा अल्टीसवरही विक्रेत्यांकडून १.२ लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे. टोयोटा ग्लान्झावर २० हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.

रेनॉफ्रेंच कार उत्पादक कंपनी रेनॉने क्‍विड हॅचबॅकवर २० हजार रुपयांचा डिस्काऊंट जाहीर केला आहे; तर नुकत्याच बाजारात दाखल केलेल्या २०१९ डस्टरवर २० हजार रुपयांची सूट देण्यात आली असून, २०१८ च्या मॉडेलवर ९५ हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com