PM किसान निधीतून ४ हजारांची मदत मिळवण्याची संधी; जाणून घ्या कसं?

३० जूनआधी रजिस्ट्रेशन केलं तर ४ हजार रुपये मिळू शकतील.
Shetkari Sanman Nidhi Yojana
Shetkari Sanman Nidhi Yojana

मोदी सरकारने शेतकऱ्यांची चिंता कमी करण्यासाठी खास PM किसान सन्मान निधीची सुरवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६ हजारांची मदत देखील केली जाते. मात्र, तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची बातमी. कारण आता तुम्हाला दोनदा सलग दोन हजार रुपये असे चार हजार रुपये मिळवता येणार आहेत. यासाठी तुम्हाला ३० जूनच्या आत किसान सन्मान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. जर तुम्ही ३० जूनआधी रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ४ हजार रुपये मिळू शकतात. (Opportunity to get Rs 4000 from PM Kisan Sanman Nidhi Know how)

Shetkari Sanman Nidhi Yojana
Corona Update : राज्यात दिवसभरात ९,८३० कोरोना रुग्णांची नोंद

३० जूनच्या आत करा अर्ज

अजूनही देशभरात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी PM किसान सन्मान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. ज्यांनी आतापर्यंत (PM Kisan Yojana) अर्ज केलेला नाही आणि ३० जूनच्या आत अर्ज केला, तर त्या शेतकऱ्यांना ४ हजार रुपये मिळू शकतात. ३० जूनच्या आधी जर या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जुलै महिन्यात २ हजारांचा हफ्ता आणि ऑगस्ट महिन्यात पुढील PM किसान सन्मान योजनेचा नववा २ हजारांचा हफ्ता दिला जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्र ४ हजार रुपये येणार आहेत.

Shetkari Sanman Nidhi Yojana
मुंबई : मुलुंडमध्ये अंगावर भिंत कोसळून एक जण ठार

केंद्र सरकारने ही योजना सुरु केली तेव्हा केंद्राकडून केवळ लहान शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जायचा. मात्र, त्यानांतर या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. आता देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

कसं कराल रजिस्ट्रेशन?

सर्वात आधी तुम्हाला PM किसान योजनेच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर या वेबसाईटवरील 'फार्मस कॉर्नर' (Farmers Corner) वर जावं लागेल. तिथे तुम्हाला 'न्यू फार्मर रजिस्ट्रेशन' (New Farmer Registration) या विकल्पावर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक भरावा लागेल. सोबत एक कॅप्चा भरून हा फॉर्म पुढे प्रोसेस होतो.

Shetkari Sanman Nidhi Yojana
"मराठा आरक्षणप्रकरणी आठवड्याभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार"

PM किसान योजनेअंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजारांची मदत केली जाते. या योजनेअंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये दिले जातात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला नाही केवळ अशांनाच ४ हजार रुपये मिळू शकतात. यातील आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे ऑगस्ट महिन्यात या योजनेअंतर्गत नववा हफ्ता दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही उशिरा रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ४ हजारांपासून वंचित राहावं लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com