अर्थसंकल्पाप्रमाणे आता आर्थिक वर्षाची तारीख बदलणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नवी दिल्ली: आर्थिक वर्षाच्या कालावधीत बदलाबाबत केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. एका सरकारी समितीने आपल्या अहवालात आर्थिक वर्षाची सुरुवात बदलण्याचा प्रस्ताव मांडला आहे. केंद्र सरकार सध्या या अहवालाची तपासणी करत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सांगितले.

या निर्णयाचा केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनावर दूरगामी परिणाम होणार आहे. यासाठी कोणताही निर्णय घेण्याआधी या विषयावर विस्तृत चर्चा आवश्यक आहे. त्यामुळे आत्ताच समितीच्या नेमक्या शिफारसी उघड करणे आणि सरकारची प्राथमिक भूमिका मांडणे योग्य नसल्याचे प्रतिपादन जेटली यांनी केले.

ब्रिटीशांची परंपरा कायम ठेवत आपल्याकडे एप्रिलमध्ये आर्थिक वर्ष सुरु होते. वेगवेगळ्या देशांमध्ये स्थानिक गरजांप्रमाणे आर्थिक वर्ष जानेवारी किंवा जूनमध्ये सुरु होते. यावर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख अलीकडे आणली होती.

Web Title: Panel favours start of financial year from January 1; government examining recommendation: FM Arun Jaitley