प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत नऊ टक्के वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी दिल्ली: देशात प्रवासी वाहनांच्या मासिक विक्रीत सुमारे 9.01 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या महिन्यात(फेब्रुवारी) देशात 2,55,359 प्रवासी वाहनांची विक्री झाली असून, गेल्यावर्षी हे प्रमाण 2,34,244 एवढे होते. दरम्यान, देशातील मोटार विक्रीचे प्रमाण 4.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात 1,72,623 मोटारींची विक्री झाली आहे.

दरम्यान, मोटरसायकलींच्या विक्रीत 3.13 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात एकुण 8,32,697 मोटरसायकलींची विक्री झाली असून एकुण दुचाकी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण 13,62,045 वाहनांवर पोचले आहे. याशिवाय, व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचे प्रमाण 7.34 टक्के वाढीसह 66,939 वाहनांवर पोचले आहे.

Web Title: passenger vehicles sale in india 9 percent raise

टॅग्स