
मुंबई; आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रिलायंस उद्योगसमूहाचे संचालक अनिल अंबानी यांच्यापुढे एक नवे संकट उभ ठाकले आहे. 21 दिवसाच्या त्यांना तिन चीनी बँकाचे साडेपाच हजार कोटी रुपयांची देणी फेडावी लागणार आहे. इंग्लडच्या एका न्यायालयाने हा आदेश दिला आहे. 2102 मध्ये अनिल अंबानी यांनी तीन चीनी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जासाठी अनिल अंबानी यांनी व्यक्तीगत हमी दिली होती. त्यामुळे त्यांना हे पैसै चुकवणे बंधनकारक आहे, अस न्यायाधीशांनी निर्णय देतांना म्हटले आहे.
...म्हणून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन नाही; उड्डानमंत्र्यांचा अजब निर्णय
2012 मध्ये रिलायंस कम्युनिकेशन लिमीटेडने, इंडस्ट्रियल अँड कमिर्शिय बँक ऑफ चायना,चायना डेवलपमेंट बँक आणि एक्जिम बँक ऑफ चायना या तीन चिनी बँकाकडून कर्ज घेतले होते. मात्र हे वैयक्तीक कर्ज नाही, यासाठी कुठलीही हमी अनिल अंबानी यांनी दिली नाही असं रिलायंसच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केल आहे. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत असल्याचही त्यांनी सांगितले. मात्र न्यायालयाच्या या आदेशात बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे कायदेतज्ञ सांगताहेत
या प्रकरणात एका सुनावणी दरम्यान अनिल अंबानी यांनी आपल्याकडे पैसै नसल्याचे सांगितले होते. मात्र हा युक्तीवाद न्यायाधीशांनी फेटाळला होता. अनिल अंबानी यांच्या ऑरकॉमवर 46 हजार कोटीचे कर्ज झाल्यामुळे कंपनीने दिवाळखोरी प्रक्रीयेसाठी अर्ज केला आहे. अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहावर कर्जाचा डोंगर उभा झाल्याने, अनेक उद्योग क्षेत्रातून त्यांनी माघार घेतली आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या...
अब्जाधिशांच्या यादीबाहेर
2008 मध्ये अनिल अंबानी यांचे जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून फोर्बसच्या यादीत नाव होत. मात्र आता ते या अब्जाधिशांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.रिलायंस उद्योगसमूहाच्या विवीध कंपन्यांचा तोटा हे त्यामागील मुख्य कारण आहे. 2018 मध्ये अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहावर 1.7 लाख कोटीचे कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी अंबानी यांनी उद्योगसमूहाच्या अनेक कंपन्या विक्रीला काढल्या आहे. एका प्रकरणात अनिल अंबानी यांना अटक होण्यापासून त्यांचे बंधू मुकेश अंबानी यांनी वाचवले होते.