
Paytm Lite : पासर्वडशिवाय Paytm वरून करता येणार पेमेंट
Paytm UPI Lite : पेमेंट भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. बहुतेक लोक दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी याचा वापर करतात.
हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
हा व्यवहार अधिक सोपं करण्यासाठी Paytm ने नुकतेच त्यांचे नवं फिचर UPI Lite लाँच केले आहे.
याच्या मदतीने आता यूजर्स ऑफलाइनदेखील UPI व्यवहार पूर्ण करू शकणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणताही UPI पिन टाकण्याची गरज नाही.
UPI Lite द्वारे एकावेळी 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार पूर्ण केले जाऊ शकणार आहेत. हे फिचर पेटीएम पेमेंट्स बँक यूजर्ससाठी लाईव्ह करण्यात आले असून, गेल्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेने ही सुविधा सादर केली होती.
त्यानंतर आता खाजगी UPI व्यवहार असलेले अॅप्सनेदेखील याला इंटीग्रेट केले असून, पेटीएम पेमेंट्स बँक असे करणारी पहिली खाजगी कंपनी बनली आहे.
कसं येणार वापरता?
पेटीएमच्या नवीन लाइट सेवेच्या मदतीने वापरकर्ते एकावेळी 200 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात. त्याच वेळी पेटीएम लाइट वॉलेटमध्ये दोनदा 2000 रुपये म्हणजेच कमाल 4000 रुपये टाकता येणार आहेत.
UPI Lite द्वारे केलेले पेमेंट पेटीएम बॅलन्स किंवा हिस्ट्रीमध्ये चेक केले जाऊ शकते. सध्या फक्त UPI Lite द्वारे डेबिटची सुविधा देण्यात आली आहे.
"आम्ही डिजिटल इंडिया आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि UPI लाइटचे लॉन्च हे त्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे पेटीएम पेमेंट्स बँकेचे एमडी आणि सीईओ सुरिंदर चावला यांनी म्हटले आहे.