पेटीएमचा वापर आता यत्र तत्र सर्वत्र

पेटीएमचा वापर आता यत्र तत्र सर्वत्र

नवी दिल्ली: डिजिटल पेमेट्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी, पेटीएमने आपल्या सेवा क्षेत्रांचा विस्तार करत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पेटीएम आता शिक्षण आणि नोकऱ्यांच्या क्षेत्रातसुद्धा आपली सेवा पुरवणार आहे. विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक उमेदवारांना सेवा पुरवण्यासाठी पेटीएम व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. यासाठी पेटीएम खासगी आणि सरकारी संस्थांशी भागीदारी करणार आहे. त्यातून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांच्या क्षेत्रात पेमेट्स, कॉमर्स, फायनान्शियल आणि शैक्षणिक सेवा पेटीएम उपलब्ध करून देणार आहे. 

'आम्ही सर्वच पातळ्यांवर विद्यार्थी आणि पालक यांना सुविधा पुरवू इच्छितो. यात अगदी 25,000 शाळा, महाविद्यालये, वेगवेगळे कोर्सेस, परीक्षा इथपासून ते शैक्षणिक संस्थांमधील पेमेट्स, कोचिंग, स्कॉलरशिप, टेस्टची तयारी, अॅंडमिशन फॉर्म, विद्यार्थ्यांचा विमा, शैक्षणिक कर्ज आणि बॅंकिंग इथपर्यत सर्व सेवा आम्ही पुरवणार आहोत', असे मत पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनीत कौल यांनी व्यक्त केले आहे.  

या नव्या विस्ताराअंतर्गत 20,000 खासगी शाळा,  1,000 उच्च शैक्षणिक संस्था आणि 1,000 कोचिंग संस्थांमार्फत 3 कोटी 50 लाख ग्राहकांपर्यत पोचण्याचे पेटीएमचे उद्दीष्ट आहे. यासंदर्भात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, इंडियन नेव्ही, अमेटी, व्हीआयटी, मणिपाल, एकेटीयु, आर्मी पब्लिक स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, दिल्ली विद्यापीठ, आयआयटी, आयआयएम, एनआयटी, एआयएमए, आयसीएआय, नारायण समूह, मेड इझी, करियर 360 आणि इतर असंख्या प्रतिष्ठित संस्थांशी पेटीएम याआधीच करार केले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com