पेटीएमला रु.1,549 कोटींचा तोटा

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर अचानक मागणी वाढणाऱ्या मोबाईल वॉलेट पेटीएमला सरलेल्या आर्थिक वर्षात(2015-16) तब्बल 1,549 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात चौपट वाढ नोंदविण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये पेटीएम चालविणाऱ्या वन97 कम्युनिकेशन्सला 375 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, अशी माहिती रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे दाखल कागदपत्रांतून समोर आली आहे.

या काळात कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी 3.1 कोटी रुपयांचे वेतन घेतले आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये कंपनीला 5 कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या आठवड्यात शर्मांनी पेमेंट बँकेला साह्य करण्यासाठी वन97 कम्युनिकेशन्समधील 1 टक्का हिस्सेदारीची विक्री केली होती.

केंद्र सरकारने आर्थिक चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्याचा सर्वाधिक फायदा पेटीएमला झाला आहे. वर्षअखेर पेटीएमच्या मंचावरुन दोन अब्ज व्यवहार पार पडण्याचा अंदाज आहे. पेटीएमचे 16 लाख युझर्स आहेत. कंपनीत अँट फायनान्शियल्स(अलिपे), अलिबाबा ग्रुप, एसएआयएफ पार्टनर्स, सॅफायर व्हेंचर, मिडियाटेक आणि सिलिकॉन व्हॅली बँकची गुंतवणूक आहे.

Web Title: Paytm registers a four times increase in losses, Rs 1549 cr for FY'16