Paytm ब्लॅकमेल : 8 वर्षात 7 लाखांवरून 85 लाख पगार घेणार कोण आहे ती?

बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली: पेटीएममधील माहिती चोरून पेटीएमचे संस्थापक विजेंदर शर्मा यांना 'ब्लॅकमेल' करणाऱ्या सोनिया धवनचा पगार सात लाखांवरून सत्तर लाखांवर पोचला होता. सोनियाला दरवर्षी मोठी पगारवाढ मिळत होती. आता माहिती चोरी आणि  'ब्लॅकमेल' केल्याप्रकरणी तिला १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

जानेवारी २०१० मध्ये सोनियाने  विजेंदर शर्मा यांची 'सेक्रेटरी' म्हणून कंपनीमध्ये प्रवेश केला होता. त्यांनतर सोनियाने कधी मागे वळून बघितले नाही. तिच्या पगारात दरवर्षी घसघशीत वाढ होत गेली. शिवाय गेल्या महिन्यात विजेंदर शर्मा यांनी सोनिया धवनला उपाध्यक्ष पद देऊ केले होते.  २०१० मध्ये पेटीएममध्ये कामाला रुजू झाल्यापासून तिला दरवर्षी सरासरी ९ लाख रुपये पगारवाढ देण्यात आली.  जेव्हा शर्मा यांना ब्लॅकमेल करणारे मॅसेजेस येत होते तेव्हा त्यांनी 'ब्लॅकमेल' करणाऱ्याला ती रक्कम देऊन टाकावी असे वारंवार सोनिया धवन या शर्मा यांना सांगत होती.