निवृत्तिवेतन काढा आधार क्रमांकाविना

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) निवृत्तिवेतन खात्यातून पूर्ण रक्कम काढताना आता आधार क्रमांकाची आवश्‍यकता लागणार नाही, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आज जाहीर केले. त्यामुळे निवृत्तिवेतन खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.

"ईपीएफओ'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जे "ईपीएफओ' खातेधारक आपल्या खात्यातून निवृत्तिवेतन काढू इच्छितात, त्यांना आता आधार क्रमांकाची गरज भासणार नाही. याआधी "ईपीएफओ'ने भविष्य निर्वाह निधीसाठी आधार क्रमांक आवश्‍यक असल्याचे म्हटले होते.

दहा वर्षांपेक्षा कमी सेवा असणाऱ्या "ईपीएफओ' खातेधारकांना आपल्या खात्यातून पूर्ण रक्कम काढण्यासाठी 10सी अर्ज भरावा लागेल. मात्र, 10 डी फॉर्म भरून जो खातेधारक आपले निवृत्तिवेतन खाते चालू ठेवू इच्छितात, त्यांना आधार क्रमांक अथवा सदस्य नोंदणी अर्जाची स्लिप जमा करावी लागणार आहे.

आधार क्रमांकाच्या आवश्‍यकतेबाबत "ईपीएफओ'चे अधिकारी म्हणाले, की 10सी अर्जांसाठीही आधार क्रमांकाची आवश्‍यकता होती. मात्र, हा नियम केवळ निवृत्तिवेतन खाते चालू ठेवण्यासाठी होता. मात्र, खात्यातून निवृत्तिवेतन काढण्यासाठी त्याची गरज भासणार नाही.

याआधी जानेवारीमध्ये "ईपीएफओ'ने आपल्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांना व खातेधारकांना आधार क्रमांक गरजेचा असल्याचे सांगितले होते. यानंतर भविष्य निर्वाह निधी योजना 1995 अनुसार भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी आधार क्रमांक आवश्‍यक असल्याचे म्हटले होते. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात "ईपीएफओ'ने आधार क्रमांक जमा करण्यासाठी 31 मार्च 2017 पर्यंत अंतिम मुदत दिली होती.

Web Title: pension without Aadharcard