अजून भीती इथली संपेना......

People frightened to invest in share market due to Corona virus
People frightened to invest in share market due to Corona virus

कोरोना विषाणूच्या आजाराने जागतिक महामारीचे स्वरूप धारण केले असून, जगाच्या पाठीवर विषाणू ज्या गतीने विस्तार वाढवत आहे, हे पहाता या रोगापासून मुक्तीचे लक्ष अजून फार दूर आहे हेच खरे. मागील तीन महिन्यापासून ४५ ते ५० अंशाच्या रेषेत रुग्णांच्या संखेत वाढ होत आहे, त्यात अजून खंड पडल्याचे किंवां कमी येत असल्याचे संकेत मिळत नाहीत. आपल्या देशात आजपर्यंत २० ते २२ दिवस झालेत, संपूर्ण व्यवहार व उद्योग बंद आहेत. पुढेही ३० एप्रिल पर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे. परंतु ३० एप्रिल नंतर देशातील व्यवहार व उद्योग पुनः चालू होतील का, यात शंका आहे. चीनमध्ये यारोगावर प्रतिबंध आणण्यासाठी  ६० दिवस सर्व व्यवहार बंद ठेवावे लागले होते. 

आपल्याकडील सामाजिक व्यवस्था पाहता, आपल्याला ६० दिवसातही प्रतिबंध करता येईल, यात शंका आहे. ३० एप्रिलच्या पुढे कामकाज पूर्ववत सुरु होणार नाही अशी परिस्थिती समोर येताना दिसताच आपला बाजार पुन्हा एकदा करेक्शनमध्ये उतरू शकतो. सध्या ‘निफ्टी’ या इंडेक्सच्या वायदा बाजाराचे विश्लेषण केले असता, पीसीआर १.२९, चढ-उताराचा निर्देशांक ४९, व पुटचा सर्वात कमी आयव्ही ४७ आहे. याचा आर्थ बाजारात अजून अनिश्चितता आहे. निफ्टी ८,००० अंशाखाली घसरला तर पुढे ७,००० अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता दिसत आहे. परंतु ३० एप्रिल पर्यंत जर या रोगापासून मुक्तीचे दिवस जवळ आल्याचे समक्ष आल्यास बाजार ८००० अंशही पातळी तोडून खाली घसरण्याची शक्यता कमी होईल. अशी परिस्थितीत बाजार वरच्या दिशेणे गतीने वाढेल. परंतु यासाठी अजून थोडे दिवस वाट बघावी लागेल. 

चालू संकटाच्या बाबतीत बोलताना तज्ञ सांगतात  २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा हे संकट अधिक मोठे आहे. २००८ ला आपल्या बाजारात सर्वाच्च पातळीवरून दहा महिन्यात ६४ टक्के करेक्शन झाले होते. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जागतिक शेअर नीचांकी पातळीपर्यंत झालेले करेक्शन असे आहे, इंडिया(-४०%), अमेरिका (-३८%), युरोप (-३३%), जपान(-३२%), चीन (-१६%). 

सध्याच्या परिस्थितीत एफएमसीजी क्षेत्रातील सर्वच कंपन्यांचे शेअरभाव सर्वाच्च भावाजवळ आहेत. त्यात एचयुएल, डाबर, कोलगेट, ब्रिटानिया व गोदरेज कन्झुमर या कंपन्या आहेत. ठराविक औषद बनवणार्या कंपन्याही वाढता आहे. याव्यतिरिक्त सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअरभाव घसरलेले आहेत. पुढील काही दिवस याच कंपन्यानमध्ये गुंतवणूक केल्यास या मार्केटमध्ये ही परतावा मिळू शकतो.

 तांत्रिक कल कसा राहील?
 मागील व्यावहारिक सत्रातील शेवटच्या दिवशी ‘निफ्टी’ ९,११२ अंशावर बंद झाला असून, या आठवड्यासाठी ८,४०० आणि ९,५०० अंश यापातळ्या महत्वाच्या आहेत. ९,५०० अंशांवरती एक दिवस टिकला तर पुढे १०,१३० अंशापर्यंत वाढण्याची शक्यता राहील. ८,४०० अंशांखाली ‘निफ्टी’ घसरला तर पुढे ८,००० अंशांवरतीच आधार आहे. ७,५०० अंशांपासून ‘निफ्टी’ ९,११२ पर्यंत वाढला आहे. निफ्टीचा पीसीआर(१.२९), चढ-उताराचा निर्देशांक(४९), पुटचा सर्वात कमी आयव्ही (४७) हे परिमाणे बाजाराचा ‘बॉटम’ अजून झालेला नसल्याचे संकेत देत आहे. चालू बाजारातील वाढ ९,५०० अंशापर्यंत होण्याची शक्यता दिसत असून, या पुढे ‘निफ्टी’त वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

येथून पुन्हा बाजारात घसरण होण्याची शक्यता असून, ती घसरण जर ८,००० अंशाच्या खाली टिकली तर; पुढे ७,००० अंशापर्यंत यात वाढ होऊ शकते. या आप्तीत देशाचे आर्थिक नुकसान किती होऊ शकेल, या बाबद शेअर बाजाराला अजून पक्का अंदाज आलेला नसून, यात आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता दिसताच बाजारात पुन्हा करेक्शन सुरु होण्याची शक्यता आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com