पेप्सिकोमधील नोकरभरती निम्म्यावर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 February 2019

जगप्रसिद्ध शीतपेय उत्पादक कंपनी पेप्सिको सध्या स्थित्यंतरामधून जात आहे. या वर्षाच्या सुरवातीलाच पेप्सिकोमधील नोकरभरती तब्बल 57.32 टक्क्यांनी घटली.

मुंबई : जगप्रसिद्ध शीतपेय उत्पादक कंपनी पेप्सिको सध्या स्थित्यंतरामधून जात आहे. या वर्षाच्या सुरवातीलाच पेप्सिकोमधील नोकरभरती तब्बल 57.32 टक्क्यांनी घटली आहे.

पेप्सिको आपल्या कर्मचाऱ्यांना 'लेऑफ' देणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यासंदर्भात आता पेप्सिकोमधील नोकरभरतीही निम्म्याच्या खाली आहे. कंपनीने सध्या पुनर्बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पेप्सिको पुनर्बांधणी आणि अंतर्गत बदलांवर 2023 पर्यंत अब्जावधी डॉलर खर्च करणार आहे. फेब्रुवारी 2018 पर्यंत कंपनीतील नोकरभरतीमध्ये स्थैर्य होते. मात्र, त्यानंतर कंपनीच्या नोकरभरतीत घट सुरू झाली आहे. कंपनीत सध्या जितक्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तितक्या प्रमाणात नोकरभरती केली जात नसल्याचे दिसत आहे.

मागील काही आठवड्यांमध्ये सोशल मीडियावर कंपनीने आवश्यकतेपेक्षा 57 टक्के कमी मागणी नोंदवली आहे. अमेरिका आणि रशियासह इतरही अनेक देशांमध्ये पेप्सिकोच्या उत्पादन प्रकल्पांमधील नोकरभरती घटली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PepsiCo Reduces their Hiring