सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने देशांतर्गत इंधन दरात घसरण झाली आहे. तेल वितरक कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

मुंबई : जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने देशांतर्गत इंधन दरात घसरण झाली आहे. तेल वितरक कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. पाच दिवसांत पेट्रोल ३२ पैशांपर्यंत आणि डिझेल १४ पैशांपर्यंत स्वस्त झाले. सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटरमागे ३० पैशांनी स्वस्त झाले.
 

Web Title: Petrol-diesel cheap for the fifth day