पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

नवी दिल्ली - कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या काळात रोखलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ पुन्हा सुरू झाली असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी त्यात वाढ झाली. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २३ पैसे वाढ झाली. 

कर्नाटकातील निवडणुकीमुळे २५ एप्रिलपासून सलग १९ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली नव्हती. कालपासून (ता. १४) दरवाढ पुन्हा सुरू झाली आहे. काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १७ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २१ पैसे वाढ झाली होती. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २३ पैसे वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढलेले असल्याने तेल कंपन्यांवर बोजा पडत आहे. यामुळे तेल कंपन्या हा बोजा आता ग्राहकांवर टाकू लागल्या आहेत. याआधी अर्थ मंत्रालयानेही इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची जबाबदारी झटकून राज्यांनीच कर कपात करावी, असा सल्ला दिला होता. यामुळे आगामी काळात इंधन दरवाढीचे चटके ग्राहकांना बसणार आहेत.

जागतिक पातळीवर वाढ  (२५ एप्रिल ते १४ मे) 
पेट्रोल - ४.१४ डॉलर प्रतिबॅरल
डिझेल- ३.९५ डॉलर प्रतिबॅरल

Web Title: Petrol diesel price hike