Petrol-Diesel Price Today | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा, जाणून घ्या आजची किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Price

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने दिलासा मिळत आहे. तेल कंपन्यांनी गुरुवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा, जाणून घ्या आजची किंमत

देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दिलासा कायम आहे. गुरुवारीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नाही. केंद्र सरकारने दिवाळीनिमित्त जनतेला मोठी भेट देत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळी तेल कंपन्यांनी दरात वाढ न केल्याने हा दिलासा कायम होता. राजधानी दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तेल कंपन्या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आज सकाळी जाहीर झालेल्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर डिझेल 94.14 रुपये प्रतिलिटर झाला आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

Petrol diesel price

Petrol diesel price

कोलकात्यात पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर, तर चेन्नईमध्ये एक लीटर पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर आहे. याशिवाय बैंगलोरबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोल 100.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 85.01 रुपये आहे आणि हैदराबादमध्ये पेट्रोल 108.20 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.62 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे.

प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर

शहराचे नाव- पेट्रोल- डिझेल

- दिल्ली- 103.97-86.67

- मुंबई- 109.98- 94.14

- कोलकाता- 104.67-89.79

- चेन्नई- 101.40-91.43

- भोपाल- 107.23-90.87

- बेंगलोर-100.58-85.01

- पटना- 105.92-91.09

- हैदराबाद -108.20-94.62

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?;पाहा व्हिडिओ

Petrol diesel price

Petrol diesel price

केंद्रानंतर अनेक राज्यांनी टॅक्स केले कमी

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर, यूपी, बिहार, त्रिपुरा, उत्तराखंडसह एनडीएच्या सर्व राज्य सरकारांनीही व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर इतर राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी करण्यात आले. दुसरीकडे, यानंतर भाजपने विरोधी पक्षांना लक्ष्य करत व्हॅट कमी करण्याची मागणी केली. मात्र, काही दिवसांनी पंजाब सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या. तसेच, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही व्हॅट कमी करून जनतेला दिलासा देण्याचे बोलले होते.

याआधी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय स्तरावर 10 नोव्हेंबरलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. बाजारात, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला नाही.

Petrol-Diesel Price

Petrol-Diesel Price

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशा ठरवल्या जातात?

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज फक्त एका एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवायचे आहे.

तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी https://iocl.com/petrol-diesel-price येथे क्लिक करा.

loading image
go to top