मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचा दर

हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
Check Today's Petrol Diesel Price Updates
Check Today's Petrol Diesel Price Updates esakal

आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर मिळत आहे तर मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Check Today's Petrol Diesel Price Updates
Petrol Diesel Price: देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे गेला आहे

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

Check Today's Petrol Diesel Price Updates
महिंद्रा अँड महिंद्राचे (M&M) शेअर्स करणार मालामाल; 72 टक्के वाढीचा तज्ञांचा अंदाज

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, 27 एप्रिल रोजी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com