आठवडाभरात पेट्रोल-डिझेलचा भडका 

वृत्तसंस्था
Saturday, 19 January 2019

नवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 2.19 रुपयांनी तर डिझेल प्रतिलिटर 3.10 रुपयांनी महागले आहे. गेल्या 9 जानेवारीपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

शनिवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 17 पैसे तर डिझेल प्रति लिटर 20 पैशांनी महागले आहे. मुंबईत शनिवारी पेट्रोलसाठी प्रति लिटर 76.35 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 68.22 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीतही शनिवारी पेट्रोल 17 पैसे आणि डिझेल 19 पैशांनी महागले आहे. दिल्लीत आता पेट्रोलसाठी प्रतिलिटर 70 रुपये 72पैसे आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 65 रुपये 16 पैसे द्यावे लागतील. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत चढ-उतार सुरु असल्याने आठवड्याभरात  पेट्रोल-डिझेल अनुक्रमे दोन आणि तीन रुपयांनी महागले आहे. पुण्यात देखील पेट्रोल  प्रतिलिटर 76.23 रुपये आणि डिझेल 67.04 रुपयांवर पोचले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol, diesel prices hiked again