पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

कच्च्या तेलाचे दर येत्या काही दिवसात 60 डॉलर प्रतिपिंपावर पोचण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या ओपेक देशांच्या बैठकीत जानवेरीमध्ये तेल उत्पादन 12 लाख बॅरल कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी तेलाच्या किंमतीत ओपेक देशांच्या बैठकीनंतर 20 टक्के वाढ झाली आहे

मुंबई : तेल उत्पादक व निर्यातदार देशांनी (ओपेक) तेल उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे जागतिक बाजारासह भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात सध्या किंमतीपासून तेलाच्या किंमतीत 5 ते 8 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाचे दर येत्या काही दिवसात 60 डॉलर प्रतिपिंपावर पोचण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या ओपेक देशांच्या बैठकीत जानवेरीमध्ये तेल उत्पादन 12 लाख बॅरल कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी तेलाच्या किंमतीत ओपेक देशांच्या बैठकीनंतर 20 टक्के वाढ झाली आहे.

तेल शुद्धीकरण कंपन्यांचा नफा वाढणार
तेल शुद्धीकरण कंपन्या कच्चे तेल सुमारे एक महिना आधी खरेदी करतात. परिणामी आधी स्वस्तात कच्चे तेल खरेदी केल्यामुळे दर वाढीचा लाभ कंपन्यांना मिळू शकणार आहे.

Web Title: Petrol, Diesel Prices to rise?

टॅग्स