Check Today's Petrol Diesel Price Updates | आठवड्याच्या सुरवातीला पेट्रोल-डिझेलचे दर वाचले का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Check Today's Petrol Diesel Price Updates

जवळपास तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

आठवड्याच्या सुरवातीला पेट्रोल-डिझेलचे दर वाचले का?

आईओसीएल (IOCL) ने सोमवारी (ता. 31) जानेवारीसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जवळपास तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, ब्रेंट क्रूड तेलाचे भाव सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सात वर्षांच्या उच्चांकावर आहेत. ब्रेंट क्रूडचे भाव सध्या प्रति बॅरल 90 डॉलरवर आहेत. हा दर ऑक्टोबर 2014 नंतरचा उच्चांक आहे. सरकारने 4 नोव्हेंबर 2021 रोजी किमती बदलल्या होत्या. त्यानंतर सरकारने दर कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

हेही वाचा: इलेक्ट्रिक की पेट्रोल? कोणती स्कूटर आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या

गेल्या तीन महिन्यांपासून वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दरात वाढ केली जात नसल्याचे मानले जात आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) शनिवारी पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यामध्ये (Pune) पेट्रोलचे दर 109.72 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.50 रुपये प्रति लीटरवर आहे. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील इतर शहरामधील इंधनाचा दर काय आहे.

हेही वाचा: सात वर्षात पेट्रोल-डिझेल सर्वात महाग, नागरिकांना झटका!

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Web Title: Petrol Diesel Prices Update 31 January 2022 Check Latest Price

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top