‘...तर मी पेट्रोल-डिझेल ३५-४० रुपयांना विकेन’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

‘‘केंद्र सरकारने मला परवानगी दिली आणि करांमध्ये थोडीफार सूट दिली, तर मी पेट्रोल-डिझलेची ३५ ते ४० रुपये प्रतिलिटर दराने विक्री करू शकतो,’’ असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले आहे. एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना रामदेवबाबांनी इंधनाच्या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘मोदी सरकारने महागाई कमी करायला हवी. जर महागाई कमी केली नाही तर सरकारला मोठा फटका बसेल. २०१९ आधी इंधनाचे दर कमी करा, असा सल्ला मी यापूर्वीच मोदी सरकारला दिला आहे.’’

नवी दिल्ली - ‘‘केंद्र सरकारने मला परवानगी दिली आणि करांमध्ये थोडीफार सूट दिली, तर मी पेट्रोल-डिझलेची ३५ ते ४० रुपये प्रतिलिटर दराने विक्री करू शकतो,’’ असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले आहे. एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना रामदेवबाबांनी इंधनाच्या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘मोदी सरकारने महागाई कमी करायला हवी. जर महागाई कमी केली नाही तर सरकारला मोठा फटका बसेल. २०१९ आधी इंधनाचे दर कमी करा, असा सल्ला मी यापूर्वीच मोदी सरकारला दिला आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Diesel Rate Ramdevbaba