पेट्रोल, डिझलचे दर दररोज बदलणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांकडून आता दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर "इंडियन ऑइल कॉर्पोरेशन', "भारत पेट्रोलियम लिमिटेड' आणि "हिंदुस्थान पेट्रोलियम' या सरकारी तेल कंपन्या सर्वसंमतीने दर पंधरा दिवसांनी पेट्रोलचे दर निश्‍चित करतात. मात्र सध्याच्या घडणार्‍या जागतिक घडामोडी आणि त्यांचा कच्च्या तेलाच्या किंमतीवर होणार्‍या परिणामामुळे आता तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल केला जाण्याबाबत विचार सुरू आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दर ठरविण्याचा अधिकार तेल कंपन्यांना मिळाला आहे. दर ठरविण्याची प्रक्रिया निश्‍चित करण्यासाठी सरकारी तेल कंपन्या एकत्रित येऊन, त्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेऊन पंधरा दिवसांनी देशातील पेट्रोलचा भाव निश्‍चित करतात. यामुळे दर पंधरा दिवसांनी दर बदलत असतात. आता ते दररोज बदलण्याची शक्यता आहे.

Web Title: Petrol, diesel rates may change on a daily basis soon; fortnightly fuel revisions likely to go