पेट्रोल 1.34,तर डिझेल 2.37 रुपयांनी महागले

वृत्तसंस्था
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांचा आढावा घेत असतात. त्यानुसार दर महिन्याच्या पहिल्या आणि 15 तारखेला बदलेले दर जाहीर केले जातात.

नवी दिल्ली: पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.34 रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.37 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज (शनिवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 

पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांचा आढावा घेत असतात. त्यानुसार दर महिन्याच्या पहिल्या आणि 15 तारखेला बदलेले दर जाहीर केले जातात. गेल्या तीन महिन्यांत इंधनाच्या दरात वाढ होण्याची ही पाचवी वेळ आहे. गेल्या वेळी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैशांनी वाढ झाली होती. 

‘इंडियन ऑईल‘च्या संकेतस्थळानुसार, बदललेले इंधनाचे दर पुढीलप्रमाणे (दर प्रतिलिटरसाठी) : 
पेट्रोल 

  • दिल्ली : 66.45 रुपये
  • कोलकाता : 69.08 रुपये 
  • मुंबई : 72.83 रुपये 
  • चेन्नई : 65.96 रुपये 

डिझेल 

  • दिल्ली : 55.38 रुपये 
  • कोलकाता : 57.64 रुपये 
  • मुंबई : 61.05 रुपये 
  • चेन्नई : 56.95 रुपये
Web Title: Petrol price hiked by Rs. 1.34 per liter