सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे देशातील इंधनाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याचा आणि जागतिक मागणीतील बदलांचाही परिणाम होत इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

मुंबई : देशातील चार सर्वात मोठ्या शहरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 14 पैशांनी वाढ झाली आहे. तर चेन्नईत पेट्रोलच्या किंमतीत 50 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत पेट्रोल 73.77 रुपये प्रति लिटर, कोलकात्यात 76.47 रुपये प्रति लिटर, मुंबईत 79.44 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईत 76.68 रुपये प्रति लिटरवर पोचले आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर ही आकडेवारी देण्यात आली आहे.

शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...

दरम्यान या चारही शहरांमध्ये डिझेलच्या किंमती मात्र स्थिरच आहेत. दिल्लीत डिझेलची किंमत 65.79 रुपये प्रति लिटर, कोलकात्यात 68.20 रुपये प्रति लिटर, मुंबईत 69.01 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईत 69.54 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

फडणवीस यांनी अद्याप वर्षा बंगला सोडला नाही, कारण...

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे देशातील इंधनाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याचा आणि जागतिक मागणीतील बदलांचाही परिणाम होत इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol prices hike continue on third day