….तर पेट्रोलपंप चालकांचा 16 जूनला देशव्यापी संप

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर 16 जूनपासून रोजच्या रोज ठरविले जाणार आहेत, या निर्णयाच्या विरोधात ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (एआयपीडीए) 16 जूनरोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एआयपीडीएने 16 जूनला 'नो पर्चेस डे' जाहीर केला आहे.

केंद्र सरकारने इंधनाच्या दैनंदिन किंमत बदलाचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा एआयपीडीए शांततापूर्ण मार्गाने त्यांचा निषेध करेल आणि 16 जूनरोजी तेल कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाही असा इशारा ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी दिला आहे.

विकसित देशांमध्ये इंधनाचे दर रोजच्या रोज ठरवले जातात. तीच पद्धत भारतामध्ये आणण्यात येणार आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. यामुळे भारतातही दररोज इंधनाचे दर बदलतील असा निर्णय सरकारने घेतला आहे. तज्ज्ञांच्या समितीने याबाबत शिफारस केली होती आणि ती सरकारकडून स्वीकारण्यात आली. त्याविरोधात आता एआयपीडीए देशव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. या निर्णयाची सुरवातीला 1 मेपासून पॉंडेचरी, विशाखापट्टण (आंध्र प्रदेश), राजस्थानातील उदयपूर, झारखंडमधील जमशेदपूर आणि चंदीगढमध्ये या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानंतर 16 जूनपासून देशभर नवीन निर्णय लागू करण्यात येणार आहे.

Web Title: Petrol pump closed on June 16 2017