बारा शहरांमध्ये पेट्रोल ९१ रुपयांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली - राज्यातील तब्बल १२ शहरांमध्ये पेट्रोल ९१ रुपयांवर गेले असून, इंधन दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी मंगळवारी नवा उच्चांक गाठला. पेट्रोल १० पैशांनी आणि डिझेल ९ पैशांनी महागले. मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ८९.५४ रुपयांपर्यंत गेला. डिझेलसाठी ग्राहकांना ७८.४२ रुपये मोजावे लागत होते. इंधनावरील स्थानिक करांमुळे राज्यातील १२ शहरांमध्ये पेट्रोल दर सर्वाधिक आहे. परभणीत पेट्रोल ९१.२७ रुपये असून डिझेल ७९.१५ रुपये आहे.

नवी दिल्ली - राज्यातील तब्बल १२ शहरांमध्ये पेट्रोल ९१ रुपयांवर गेले असून, इंधन दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी मंगळवारी नवा उच्चांक गाठला. पेट्रोल १० पैशांनी आणि डिझेल ९ पैशांनी महागले. मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ८९.५४ रुपयांपर्यंत गेला. डिझेलसाठी ग्राहकांना ७८.४२ रुपये मोजावे लागत होते. इंधनावरील स्थानिक करांमुळे राज्यातील १२ शहरांमध्ये पेट्रोल दर सर्वाधिक आहे. परभणीत पेट्रोल ९१.२७ रुपये असून डिझेल ७९.१५ रुपये आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नंदुरबार, नांदेड, लातूर, जळगाव, बीड, औरंगाबाद, रत्नागिरी आणि सोलापूर आदी शहरांमध्ये पेट्रोलचा दर ९० ते ९१ रुपयांच्या दरम्यान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Rate 91 Rupees in 12 City