"भारत पेट्रोलिय'च्या खासगीकरणाला पेट्रोलियम मंत्र्यांचे अप्रत्यक्ष समर्थन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

व्यवसाय करणे हा सरकारचा उद्देश नाही, असे सांगत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील खासगीकरणाचे अप्रत्यक्षपणे सर्मथन केले.

नवी दिल्ली : व्यवसाय करणे हा सरकारचा उद्देश नाही, असे सांगत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील खासगीकरणाचे अप्रत्यक्षपणे सर्मथन केले. खासगीकरणामुळे बाजारात स्पर्धा निर्माण होऊन ग्राहकांचा फायदा होईल, असे प्रधान यांनी स्पष्ट केले. 

यापूर्वी दूरसंपर्क आणि नागरी हवाई सेवा क्षेत्रात खासगीकरण केल्याने निकोप स्पर्धा निर्माण झाली. यातून कंपन्यांनी भाडे कपात केल्याने ग्राहकांचा फायदाच झाला असे प्रधान यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून तेल आणि वायू निर्मितीतील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल)च्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र त्यावर प्रधान यांनी बोलणे टाळले.

सौदी अरामको, फ्रान्सची टोटल एसए आणि एक्‍झॉन मोबिल या आंततराष्ट्रीय तेल वितरकांना भारतीय बाजारपेठ खुली करण्याचे सरकारचे नियोजन आहे. "बीपीसीएल"मधील हिस्सा विक्री केल्यास सरकारचे चालू वर्षातील निर्गुंतवणुकीचे निर्धारित उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे. सध्या 95 टक्के पेट्रोल व डिझेलचे किरकोळ वितरण तसेच केरोसीन आणि स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी)चे जवळपास 100 टक्के वितरण हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे केले जात आहे. 

web title : Petroleum Ministers' Indirect Support for the Privatization of Bharat Petroleum

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petroleum Ministers' Indirect Support for the Privatization of Bharat Petroleum