'PF'चा व्याजदर केला कमी; 7 वर्षांतील नीचांकी पातळीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

बंगळूर : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (EPFO) चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. EPFO च्या पाच कोटी सदस्यांना 2016-17 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या ठेवींवर 8.65 टक्के दराने व्याज मिळणार आहे. मागील वर्षी (2015-16) निधीवर 8.8 टक्के व्याज देण्यात आले होते.

अर्थ मंत्रालयाने EPFO च्या पाच कोटींहून अधिक सदस्यांना 8.75 टक्के दराने व्याज मिळावे अशी भूमिका घेतली होती. मात्र ईपीएफवर इतके व्याज न देण्याची भूमिका जाहीर केली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षाप्रमाणेच 2016-17 या आर्थिक वर्षातही ईपीएफवर व्याजदर 8.8 टक्के इतका मिळण्याचे बोलले जात होते. यासंबंधी केंद्रीय विश्वस्त मंडळाची आज बंगळूर येथे झालेल्या बैठकीत भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8.65 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या चालू आर्थिक वर्षांच्या सुमारे रु.39 हजार कोटींच्या उत्पन्न अंदाजानुसार, ईपीएफवर 8.8 टक्के व्याज दिल्यास रु.368 कोटींची तूट निर्माण होणार होती. तर 8.7 टक्के व्याज दिल्यास 69.34 कोटींची अतिरिक्त रक्कम जमा होणार होती. या पार्श्वभूमीवर कामगार मंत्रालयाने 8.8 टक्के व्याज देण्याची मागणी कायम ठेवण्यात आली होती.
 
Web Title: PF interest reduced