महाराष्ट्रात हजारो कर्मचारी होणार बेकार; फायझर करणार दोन प्रकल्प बंद 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जानेवारी 2019

मुंबई: फायझर कंपनीने देशातील दोन औषधनिर्माण प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेनिसिलिनसारख्या इंजेक्टेबल्स औषधाची देशात मागणी घटल्याने कंपनीने असे इंजेक्टेबल्स बनविणारे दोन उत्पादन प्रकल्प बंद करणार आहे. याचा महाराष्ट्र आणि तामिळनाडू असणाऱ्या 1700 कर्मचाऱ्यांना आता फटका बसण्याची शक्यता आहे. 

जागतिक पातळीवर फायझर कंपनीत काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 6 टक्के कर्मचारी या दोन प्रकल्पात काम करतात. फायझरने केलेल्या मूल्यमापनातून निघालेल्या निष्कर्षानुसार, उत्पादनाच्या मागणीत लक्षणीय घट झाल्यामुळे प्रकल्प दीर्घकाळात सुरु ठेवणे व्यवहार्य नसल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

ठाणे-बेलापूर पट्टय़ात गेल्या अर्धशतकापासून सुरु असलेला फायझर कंपनीचा औषधनिर्माण प्रकल्प  देखील 16 सप्टेंबर 2015 मध्ये बंद करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देण्यात आला होता. त्यावेळी तेथील 2012 पैकी 132 कामगारांनी याचा लाभ घेतला होता. 
 
Web Title: Pfizer To Shut Two India Plants, 1700 Employees To Be Impacted