औषध कंपन्यांना निर्यातीसाठी  "एनओसी' बंधनकारक नाही 

पीटीआय
शनिवार, 24 मार्च 2018

औषधनिर्मिती कंपन्यांना औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांची निर्यात करण्यासाठी केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संस्थेकडून (सीडीएससीओ) "ना हरकत प्रमाणपत्र' घेण्याच्या अटीतून सवलत देण्यात आली आहे.

व्यवसायपूरक वातावरणाच्या दिशेने पाऊल 

नवी दिल्ली : औषधनिर्मिती कंपन्यांना औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांची निर्यात करण्यासाठी केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संस्थेकडून (सीडीएससीओ) "ना हरकत प्रमाणपत्र' घेण्याच्या अटीतून सवलत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने व्यवसायपूरक वातावरण तयार करण्याचे दिशेने पाऊल टाकत हा निर्णय घेतला आहे. 

याआधी परवानाप्राप्त औषधनिर्मिती कंपन्या औषधे, वैद्यकीय उपकरणांची निर्यात केवळ अमेरिका, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय समुदायात करू शकत होत्या. "सीडीएससीओ'ने काल दिलेल्या सूचनेनुसार, परवानाप्राप्त औषधनिर्मिती कंपन्यांनी निर्यात उत्पादनांची बिले सादर केल्यास त्यांना ना हरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता असणार नाही. भारतातील औषधे, वैद्यकीय उत्पादने आणि सौंदर्यप्रसाधने निर्मिती क्षेत्रातील व्यवसायपूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. याचवेळी कंपन्यांना उत्पादनांची निर्यात करताना संबंधित देशांच्या नियमांचे पालन करावे लागेल. उत्पादनांची निर्यात करण्यात येत असलेल्या देशाच्या नियमांप्रमाणे कंपन्यांना प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

 

Web Title: Pharmaceutical can exports pharma products without obtaining NOC

टॅग्स