ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील (पीएमसी) निर्बंधांमुळे बॅंकेचे खातेदार आणि ठेवीदार प्रचंड मानसिक तणावात आहेत. या तणावामुळे दोन खातेदारांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पीएमसी बॅंकेच्या प्रशासकांनी बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची भेट घेतली. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बॅंक कटिबद्ध असल्याची ग्वाही ‘पीएमसी’चे प्रशासक जे. भोरिया यांनी दिली.

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील (पीएमसी) निर्बंधांमुळे बॅंकेचे खातेदार आणि ठेवीदार प्रचंड मानसिक तणावात आहेत. या तणावामुळे दोन खातेदारांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पीएमसी बॅंकेच्या प्रशासकांनी बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची भेट घेतली. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बॅंक कटिबद्ध असल्याची ग्वाही ‘पीएमसी’चे प्रशासक जे. भोरिया यांनी दिली. 

बुडीत कर्जांमधील अनियमिततेच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर निर्बंध घातले. खातेदारांना बॅंकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली, मात्र त्यात टप्प्याटप्प्यात वाढ केली आहे. सध्या पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना ४० हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्यात परवानगी देण्यात आली. मात्र बॅंकेच्या शाखांमधील प्रचंड गर्दी आणि समाज माध्यमांमधील विविध संदेशांमुळे पीएमसीचे खातेदार हवालदिल झाले आहेत.

बॅंकेवरील निर्बंध हटवण्यासाठी पीएमसीचे खातेदार रिझर्व्ह बॅंकेविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, भोरिया यांनी गव्हर्नर शक्तिकांत दास आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन बॅंकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Bank depositor security