कार्यकारी संचालकांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) व्यवस्थापनाने सोमवारी राजीव शरण आणि के. व्ही. ब्रम्हाजी राव या दोन कार्यकारी संचालकांची हकालपट्टी केली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपपत्रात ‘सीबीआय’ने या दोघांवर आरोप ठेवले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बॅंकेकडून कारवाई करण्यात आली आहे. 

‘पीएनबी’तील गैरव्यवहारप्रकरणी ‘सीबीआय’ने सोमवारी आरोपपत्र दाखल केले. यामध्ये विद्यमान दोन संचालक आणि बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रह्यमण्यम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ‘पीएनबी’च्या संचालक मंडळाची सोमवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीत शरण आणि ब्रम्हाजी राव यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पदांवर नव्याने नियुक्ती करण्याची विनंती ‘पीएनबी’ने सरकारकडे केल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव राजीव कुमार यांनी दिली.

‘बॅंक राष्ट्रीयकरण योजना १९७०’च्या कलम ८ अन्वये दहा दिवसांपूर्वी या दोन्ही संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत दोषी आढळून आल्यानंतर तातडीने कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. गैरव्यवहाराला कारणीभूत असलेल्यांना पाठीशी घालणार नाही, हा संदेश या कारवाईतून दिला आहे. 

उषा अनंतसुब्रह्यमण्यम यांची गच्छंती
अलाहाबाद बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंतसुब्रह्यमण्यम यांची गच्छंती होण्याची शक्‍यता आहे. ‘पीएनबी’च्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अनंतसुब्रह्यमण्यम यांच्यावर ‘सीबीआय‘ने ठपका ठेवला आहे. केंद्र सरकारने अलाहाबाद बॅंकेच्या संचालक मंडळाला अनंतसुब्रह्यमण्यम यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑगस्ट २०१५ ते मे २०१७ या कालावधीत अनंतसुब्रह्यमण्यम यांनी ‘पीएनबी’च्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती.

Web Title: PNB fraud