‘फायरस्टार’च्या उपाध्यक्षाला अटक 

पीटीआय
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई/नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या फायरस्टार ग्रुपच्या उपाध्यक्षाला सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. श्‍याम सुंदर वाधवा असे अटक केलेल्या उपाध्यक्षाचे नाव आहे. त्याला करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. तो नीरव मोदी याचा निकटवर्ती सहकारी मानला जातो. तो मोदीच्या संपर्कात होता आणि मोदी व त्याच्या सहकाऱ्यांच्या वतीने करचुकवेगिरीमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. 

Web Title: PNB fraud case ED The arrest of the firestar superintendent