‘पीएनबी’त चोक्सीच्या सहभागामुळेच कारवाई

पीटीआय
शुक्रवार, 4 मे 2018

नवी दिल्ली - ‘पीएनबी’ गैरव्यवहारात मेहुल चोक्‍सी याच्या सहभागामुळेच गीतांजली जेम्स कंपनीतील दागिन्यांचा साठा जप्त केल्याची माहिती आज सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दिल्ली उच्च न्यायालयास दिली. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत ‘ईडी’ने प्रतिज्ञापत्र सादर करून आपली बाजू मांडली. मेहुल चोक्‍सी हा सध्या फरार असून, त्याने गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत सहकार्य केले नाही. गीतांजली कंपनीवर त्याचे थेट नियंत्रण असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण ‘ईडी’ने न्यायालयात दिले.

Web Title: PNB mehul choksi crime