‘पीएनबी’चे पतमानांकन ‘मूडीज’ने घटविले   

पीटीआय
मंगळवार, 22 मे 2018

नवी दिल्ली - पतमानांकन संस्था मूडीजने पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारामुळे बॅंकेचे पतमानांकन घटविले आहे. बॅंकेचे पतमानांकन स्थिर वर्गवारीमध्ये असून, गैरव्यवहाराचा नकारात्मक परिणाम बॅंकेवर झाल्याचे मूडीजने म्हटले आहे. 

‘पीएनबी’चे स्थानिक व परकी चलन ठेवीचे पतमानांकन ‘बीएए३’ या गुंतवणुकीखालील दर्जावरून ‘बीए१’ बिगरगुंतवणूक दर्जावर घसरवण्यात आले आहे. याचबरोबर बॅंकेचे आधार कर्ज पतमानांकनही ‘बीए३’वरून ‘बी१’वर आणण्यात आले आहे. बॅंकेतील गैरव्यवहाराचा नकारात्मक परिणाम होऊन बॅंकेच्या नफ्यात मोठी घसरण झाली आहे. याचबरोबर बॅंकेच्या भांडवली स्थितीवर याचा परिणाम झाला आहे. बॅंकेतील गैरव्यवहार अनेक वर्षे उघडकीस न आल्याने अंतर्गत नियंत्रण कमकुवत असल्याचे निरीक्षण मूडीजने नोंदविले आहे. 

‘पीएनबी’ गैरव्यवहार  - 14,400 कोटी रुपये 
चौथ्या तिमाहीतील तोटा  - 13,417  कोटी रुपये 

Web Title: PNB rating was reduced by Moodys