‘पीएनबी’ला ‘सेबी’ची तंबी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - गैरव्यवहाराशी निगडित माहिती शेअर बाजारात उघड करण्यास दिरंगाई केल्याबद्दल पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ने तंबी दिली आहे.  ‘सेबी’ने ‘पीएनबी’ला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की नीरव मोदी आणि गीतांजली समूहातील कंपन्यांशी निगडित संशयास्पद व्यवहारांची माहिती ‘पीएनबी’ने शेअर बाजारात देण्यास एक ते सहा दिवसांचा विलंब लावला आहे.

रिझर्व्ह बॅंक आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सादर केलेल्या तक्रारींची माहिती शेअर बाजारात उघड करण्यास ‘पीएनबी’ने दिरंगाई केली. यामुळे भविष्यात ‘पीएनबी’ने नियमांचे पालन करावे, असा इशारा देण्यात येत आहे.

Web Title: PNB regresses SEBI